Nigdi : रविवारी रंगणार भक्ती-शक्ती सायक्लोथॉनचा थरार

एमपीसी न्यूज –  इंडो एथलेटिक सोसायटी यांच्यावतीने रविवारी (दि.3) सातव्या ( Nigdi )  भक्ती-शक्ती सायक्लोथानचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी येथील अप्पूघर कॉर्नर सकाळी सहा वाजता फ्लॅगऑफ नंतर या सायक्लोथॉनला सुरुवात होणार आहे.

Central Railway : राम करण यादव मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक

मागील सात वर्षांपासून पर्यावरण जागरुकतेसाठी ही सायक्लोथॉन भरवली जाते. यावर्षीही या सायक्लोथॉन ला उत्त्म प्रतिसाद मिळाला असून 500 सायकलपट्टू यात सहभागी होणार आहेत. ही सायक्लोथॉन सकाळी सहा वाजता सुरु होऊन अप्पुघरकॉर्नर – रावेत – मुकाई चौक – तळेगाव – कामशेत – लोणावळा अशी 100 किमी अंतर कापणार आहे. या साक्लोथॉन च्या नियोजनासाठी 100 स्वंयसेवक काम पाहणार आहेत. दुपारी 12 वाजता या साक्लोथॉनची सांगता होणार आहे.

आत्तापर्यंत घोरावडेश्वर बाईक अन्ड हैक, भक्ती शक्ती सायक्लोथॉन, पुणे ते पंढरपूर सायकलवारी अशा विविध उपक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते ज्याला नारिकांचा उत्तम प्रतिसाद ( Nigdi ) मिळतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.