Vadgaon Maval News : जांभूळकर युवा मंच आयोजित स्पर्धांना भरघोस प्रतिसाद

एमपीसी न्यूज – जांभूळ येथील माजी सरपंच संतोष जांभूळकर युवा मंचाच्या वतीने शुक्रवारी (दि.13) रोजी ऑनलाइन वक्तृत्व, मेहंदी व वेषभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 350  महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बक्षीस वितरण मंगळवारी (दि.17) झाले. श्रावण महिना, व्रतवैकल्ये व 21 व्या शतकातील सावित्रीच्या लेकी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक –  वर्षा नवघणे, द्वितीय क्रमांक –  दीप्ती जांभूळकर, तृतीय क्रमांक –  सोनाली सातकर यांनी मिळविला.

मेंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक – पूजा सातकर, द्वितीय क्रमांक –  प्रज्ञा दाभाडे, तृतीय क्रमांक – पूजा कोंढरे यांनी मिळविला.

पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक – वसुधा बालघरे, द्वितीय क्रमांक – प्रीती गाडे, तृतीय क्रमांक –  गौरी कुंभार यांनी मिळविला.

विजयी  प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला सोन्याची नथ व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकाला पैठणी  व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकाला चांदीचा छल्ला व सन्मान चिन्ह देण्यात आले.

या ऑनलाइन स्पर्धेत जांभूळ, कान्हे, कामशेत, साते, चिखलसे, कुसगाव, बऊर, घोणशेत, उकसान, करंजगाव, गोवित्री, कांब्रे, साई व आंबी आदी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महिलांची सहभाग घेतला.

या वेळी माजी आदर्श सरपंच संतोष जांभूळकर, सरपंच विजय सातकर, नागेश ओव्हाळ, माजी उपसरपंच प्रकाश आगळमे, लक्ष्मण सातकर, मदन शेडगे, कैलास कोंढरे, अमोल धिडे, भानुदास जांभूळकर, योगेश जांभूळकर, गिरीश जांभूळकर, संदीप शेडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भानुदास जांभूळकर यांनी केले. आभार दत्तात्रय जांभूळकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.