Pimpri News: औद्योगिक परिसरात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणा-या एजंटचा सुळसुळाट – अभय भोर

एमपीसी न्यूज – नोकरी देण्याच्या उद्देशाने नागरिकांना गंडा घालणा-या बनावट एजंट लोकांचा पिंपरी-चिंचवड, चाकण औद्योगिक परिसरात सुळसुळाट सुरु आहे. अनेक सुशिक्षित बेकार तरुणांची फसवणूक होत आहे. पोलीस विभागाने अशा एजंटची पूर्णतः चौकशी करून फसवणूक झालेल्या युवकांना न्याय द्यावा, अशी मागणी छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भोर यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील अनेक जिल्ह्यांमधून तरुण पिंपरी-चिंचवड, चाकण औद्योगिक परिसरामध्ये काम शोधण्याच्या उद्देशाने येत असतात. परंतु, त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अनेक एजंट त्यांच्याकडून हजारो रुपये उकळतात आणि नंतर ते फोन बंद करून या तरुणांना भेटत सुद्धा नाहीत. त्यामुळे अनेक तरुणांची फसवणूक होत आहे. अनेक इंटरनॅशनल कंपन्यांची लालूच दाखवून राहण्याची सुविधा, कॅन्टीन, बसची सुविधा अशा प्रकारचे सांगण्यात येते.

या प्रकाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे. संबंधित लोकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व तरुणांची होणारी फसवणूक टाळावी, अशी मागणी भोर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.