Pimpri : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त  अभिवादन

एमपीसी न्यूज – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश (Pimpri) मिडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Pimpri : लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या व्यापक विचारांचा, देशभक्तीचा वारसा सर्वांनी जोपासावा – आयुक्त सिंह

यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या शिंनगारे, तांबे रोहिदास तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नाझमीन शेख व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

इयत्ता नववीच्या विद्यार्थीनी रिया परमार, श्रावणी सोळंकी, अर्पिता तिवारी, वाघमारे प्रिया, राहुल चौधरी, समृद्धी जगताप, विद्यार्थीनीनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला ठोंबरे – घोगरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रियांका शहाबादे  यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.