Pimpri : नागरिकांनो! पाणी उकळून, गाळून घ्या; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पवना नदीत (Pimpri) सद्यस्थितीत गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून घ्यावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका रावेत येथील बंधा-यातून पाणी उचलते. ते पाणी प्राधिकरणातील जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करून शहरातील विविध भागातील टाक्यांमध्ये वितरित केले जाते.

Pimpri : लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या व्यापक विचारांचा, देशभक्तीचा वारसा सर्वांनी जोपासावा – आयुक्त सिंह

सद्यस्थितीत पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पवना नदीत सद्यस्थितीत (Pimpri) गढूळ पाणी येत आहे. हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करण्यात येत असून पिण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. तथापि, खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून घ्यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.