Pimpri : लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या व्यापक विचारांचा, देशभक्तीचा वारसा सर्वांनी जोपासावा – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी (Pimpri) मिळवणारच अशी गर्जना करून स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तांमध्ये क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, देशातच नव्हे तर परदेशातही छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा सादर करून महाराष्ट्राच्या लौकीकात भर पाडण्याची अद्वितीय कामगिरी करणारे साहित्यरत्न, थोर कामगार नेते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या व्यापक विचारांचा, देशभक्तीचा वारसा सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महापालिकेतील प्रतिमेस तसेच पुतळ्यास आयुक्त शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास उप आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब कसबे, कार्याध्यक्ष सचिन दुबळे, सचिव नितीन घोलप, सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे, भाऊसाहेब अढागळे, युवराज दाखले, सुनिल भिसे, नितीन घोलप, विशाल कसबे, रामदास कांबळे, महेंद्रकुमार गायकवाड, निलेश घुले, तुकाराम गायकवाड, राजेश चव्हाण, विष्णु तिकोणे उपस्थित होते.

Pune Metro News : व्हॉट्स ॲपवरून काढा मेट्रोचे तिकीट

लोकमान्य टिळक यांच्या टिळक चौक येथील पुतळ्यास तसेच माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्याही पुतळ्यास आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे, ओंकार पवळे, प्रदीप पाटील, ज्योती गवारे, अनिता लांडे उपस्थित होत्या.

निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या (Pimpri) पुतळ्यास आयुक्त शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी माजी नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब कसबे, सामाजिक कार्यकर्ते मनोज तोरडमल, युवराज दाखले, सतिश भवाळ, अरूण जोगदंड, संजय ससाणे, दत्तू चव्हाण, संदीपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, सुनिल भिसे, रामदास कोळंबे, डि. पी. खंडाळे, नितीन घोलप, संजय ससाणे, नाना कसबे, राजू चव्हाण, बालाजी गवारे, विठ्ठल कळसे, विशाल कसबे, मयुर गायकवाड, योगेश लोंढे, गणेश साठे, ऍड. महेंद्रकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधनपर्वानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने 1 ते 5 ऑगस्ट 2023 या (Pimpri) कालावधीत पाच दिवसांच्या प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधनपर्वात वृक्षारोपण, परिसंवाद, चर्चासत्र, वाद्यांची जुगलबंदी, किर्तन, समाजविकास विभागामार्फत महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती, सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाचा प्रबोधनपर्व पर्यावरणपुरक करण्याच्या अनुषंगाने परिसरात 500 झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ आज आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब कसबे तसेच आदी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.