Pimpri News: माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या सांगवी येथील पुतळयास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, आरोग्य निरिक्षक संजय मानमोडे, उद्धव डवरी, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते मुकादम विकास कांबळे आणि घंटागाडी कर्मचारी विनोद कांबळे यांना उत्तम कामगीरीबद्दल सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.