Chikhali : उसने दिलेले पैसे मागितल्याने एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – उसने दिलेले पैसे मागतिल्याने एकाला खुर्चीने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरूवारी (दि. 20) रात्री साडेआठ वाजता पूर्णानगर येथे घडली.

सिद्धांत गोरख गुप्ता (वय-36, रा. नत्रक्ष फेज-2, पूर्णानगर), असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप सर्जदयाल गुप्ता (वय-38, रा. पूर्णानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने आरोपीला उसने पैसे दिले होते. हे पैसे फिर्यादीने आरोपीकडे मागितले. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने त्यांना खुर्चीने मारहाण करून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.