Pune : महापालिका पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान 

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या प्रभाग कमांक १ अ मध्ये ७, प्रभाग ४२ अ मध्ये ४ आणि ब मध्ये ३ या तीन जागासाठी आज मतदान होणार आहे. तर सोमवारी मतमोजणी होणार आहे. या तीन जागांसाठी १४ जण निवडणुकीच्या रिंगणात आहे. 
महापालिकेच्या प्रभाग कमांक १ अ आणि  प्रभाग कमांक ४२ अ आणि ब  या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.  प्रभाग कमांक १ अ अनुसूचित जाती महिला राखीव आहे. या ठिकाणी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात शिवसेना -भाजप युतीकडुन भाजपच्या ऐश्वर्या जाधव, राष्ट्रवादीकडून रेणूका हुलगेश चलवादी, वंचित आघाडीकडून रोहिणी टेकाळे या रिंगणात आहेत.

प्रभाग कमांक  ४२ फुरसुंगी -लोहगाव अ सर्वसाधारण पुरुष मध्ये शिवसेना भाजप युतीकडून शिवसेनेचे उल्हास शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पक्षाच्या आदेशानसुार शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अपक्ष उमेदवार अमोल हरपळे यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे हे उमेदवार आहेत. या जागेसाठी एकूण चार जण रिंगणात आहेत.  प्रभाग कमांक  ४२  फुरसुंगी -लोहगाव ब सर्वसाधारण महिलामध्ये शिवसेना भाजप युतीकडून भाजपच्या अश्विनी किशोर पोकळे यांनी तर राष्ट्रवादीकडून भाग्यश्री कामठे आणि अपक्ष उमेदवार शिला पवार या निवडणूक लढवत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.