Pune : पालकांनो मुलांवर अपेक्षाचे ओझे लादू नका – इरफान सय्यद 

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी ठेवा. पालकांनो आपल्या मुलाला आवड कोणती आहे हे बघा. तुमच्या अपेक्षांचे ओझे लादू नका, असे मत भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी भोसरी येथे व्यक्त केले.

शिवसेनेच्या 53 व्या भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात वर्धापनदिनानिमित्त शिवसेना भोसरी विधानसभा व महाराष्ट्र मजदूर संघटना महासंघ आयोजित दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभ शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष इरफान सय्यद, अरुण गिरे, राम गावडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे, धनंजय आल्हाट, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, माजी नगरसेविका विजया जाधव, सुरेख बोरुडे, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर, माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, भोसरी विधानसभा संघटिका वेदश्री काळे, कल्पना पालांडे आदी उपस्थित होते.

इरफान सय्यद पुढे म्हणाले, ” जीवनात कोणती ही गोष्ट अशक्य नाही. विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी ठेवून आपले ध्येय साध्य करावे. विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टीची माहिती हवी असेल त्यांना महाराष्ट्र मजदूर संघटना कार्यालायचे दार उघडे आहे. हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी कायम मदतीसाठी तत्पर राहील”

उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ” आता स्पर्धा खूप वाढली आहे. आपल्या मुलांचे करिअर आपल्या हातात आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना मानसिक दबाव आणू नये. त्यांच्या कलाने घ्यावे” आढळराव पाटील यांनी इरफान सय्यद करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी प्रा. विलास वाळके व ऍड. रोहित अकोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरवण्याची जबाबदारी शिक्षक पालक आणि विद्यार्थी या तिघांची आहे. शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया समजून घ्या. प्रत्येक क्षेत्रात संधी आहे. मात्र ती शोधता आली पाहिजे. त्यामधून योग्य ते क्षेत्र निवडून प्रगती साधली पाहिजे. आई वडिलांचे स्वप्न आणि तुमची महत्वाकांक्षा याची सांगड घालता आली पाहिजे. मोबाइल आणि इंटरनेटचा वापर आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी करा असे प्रा. वाळके यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना भोसरी विधानसभा महाराष्ट्र मजदूर संघटना महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव गव्हाणे, कैलास नेवासकर, दिलीप सावंत, शरद हुले, अनिल दुराफे, काळुराम शिंदे, स्मिता जगदाळे, उज्ज्वला सावंत, नंदा दातकर, साधना गडसिंग, मनीषा परांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.