Chikhali : कंपनीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट; तीन कामगार जखमी

एमपीसी न्यूज – सोनवणे वस्ती चिखली येथील मोरया डाय कास्टर कंपनीमध्ये नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये तीन कामगार जखमी झाले आहेत. कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.

राहुल गौंड (वय 25 रा. हरगुडे वस्ती, कुदळवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. अन्य दोन जखमी कामगारांची नावे समजू शकली नाहीत.

सोनवणे वस्ती चिखली येथे प्रमोद थोरात यांनी मोरया डाय कास्टर कंपनी आहे. कंपनीमध्ये शनिवारी सहा कामगार काम करत होते. कंपनीत डाय बनवण्याचे काम सुरू असताना कंपनीत असलेल्या नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट झाला. तीन कामगार या स्फोटात जखमी झाले. राहुल गौंड या कामगाराच्या पायाला गंभीर जखम झाली. सर्व कामगारांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोट झालेल्या सिलेंडरचे तुकडे सापडले नाहीत. कंपनीच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर आणि चिखली अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. उप अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, फायरमन अवधूत आल्हाट, तानाजी चिंचवडे, चंद्रशेखर घुले, महेंद्र फाटक, संभाजी दराडे, वाहन चालक नितीन कोकरे, संदीप जगताप यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.