Moshi : ‘वाईन्स’च्या दुकानातून 80 किलो प्लास्टिक जप्त; 23 हजार रुपयांचा दंड वसूल 

एमपीसी न्यूज – प्लास्टिकचा वापर करणा-या मोशी परिसरातील व्यावसायिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी आज (शनिवारी) धडक कारवाई केली. एका वाईन्स या दुकानातून सुमारे 80 किलो प्लास्टिक पिशव्यांसह 85 किलो प्लास्टिक जप्त करून 23 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

परिसर स्वच्छता व प्लास्टिक निर्मुलन कारवाईच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिल्या आहेत. त्याअंतर्गत सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आरोग्य निरीक्षक विजय दवाळे,  वैभव कांचनगौडार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

प्लास्टिक वापरावर निर्बंध आहेत. असे असतांनाही अनेक व्यावसायिक वापरासाठी सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करतात. प्लास्टिकचा वापर करणा-या स्पाईन चौक मोशी परिसरातील व्यावसायिकांकडून सुमारे 85 किलो प्लास्टिक जप्त करून 23  हजार रुपये दंड वसूल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.