Pavana Dam: पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम;  24 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण  (Pavana Dam) परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात 77 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 1.72  टक्क्यांनी वाढला असून धरणात एकूण 23.90 टक्के पाणीसाठा आहे.

पिंपरी – चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत  पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

 

पवना धरणातील परिस्थिती!

* गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 77 मि.मि.

* 1 जूनपासून झालेला पाऊस = 545 मि.मि.

* गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 570 मि.मि.

* धरणातील सध्याचा पाणीसाठा = 23.90 टक्के

* गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 34.94 टक्के

* गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 1.72 टक्के

*  1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 7.05 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.