Pimpri: शहर व परिसरात वळवाच्या पावसाची दमदार हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा

heavy-rains-lash-pimpri-chinchwad-today-bringing-respite-from-heat-to-pimpri-chinchwadkars

एमपीसी न्यूज – शहराच्या बहुतेक भागात आज संध्याकळी विजांच्या कडकडाटासह वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या उन्हाळ्यात शहरात प्रथमच वळवाचा पाऊस पडल्याने उकाड्याने हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला. रात्री साडेसातनंतर मावळातही जोरदार पाऊस सुरू झाला.

दुपारपासूनच शहरावरील आकाशात काळे ढग दाटून आले होते. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसास सुरूवात झाली. सुमारे 20 मिनिटे जोरदार कोसळल्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा पावसास सुरूवात झाली. हा हलका ते मध्यम स्वरूपाच्या रात्री बराच वेळ बसरत होत्या.

गेले काही दिवस आकाशात काळे ढग दाटून अंधारून येत होते, मात्र पाऊस हुलकावणी देत होता. पुणे, लोणावळा या ठिकाणी पाऊस झाला, मात्र पिंपरी-चिंचवड शहर कोरडेच होते, गेले काही दिवस हवेतील उकाडा कमालीचा वाढला होता. संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याने हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाला.

लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेल्या अनेक मुलांनी घरातून बाहेर पडून पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहराच्या बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.