Khandala : महामार्ग पोलीस उप निरीक्षकाला 32 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – खंडाळा महामार्ग पोलीस उप निरीक्षकाला 32 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज पहाटे साडेतीनच्या सुमारास करण्यात आली.

भरत तानु तांबीटकर (वय 57), असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा ट्रक आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून यातील आरोपी पोलीस भरत याने तक्रारदार यांच्या ट्रेलर ट्रकवर कारवाई न करणे व घाट रस्त्यावरून पास करून देण्याकरीता 32 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याप्रमाणे सापळा रचून भरत तांबीटकर याला पहाटे 03.40 वाजता लोणावळा हद्दीमध्ये महामार्गावर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

पोलीस उप अधीक्षक सुहास नाडगौंडा, पोलीस हवालदार करंदिकर, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कु-हे, किरण चिमटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.