Hinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासादरम्यान प्रवाशाचा लॅपटॉप चोरला

एमपीसी न्यूज – मुंबईहून पुण्याकडे बसमधून येत असताना तरुणाचा लॅपटॉप, हेडफोन आणि मनगटी घड्याळे असा सुमारे 89 हजरांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी पाच ते रात्री साडेआठच्या सुमारास दादर ते वाकड ब्रिज या बस प्रवासादरम्यान घडली.

करण संजीव चावला (वय 30, रा. बालेवाडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चावला रविवारी दादर येथून पुण्याला येत होते. दुपारी साडेपाचच्या सुमारास ते दादर येथून शिवनेरी बसमध्ये बसले. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या सामानातून लॅपटॉप, हेडफोन आणि दोन मनगटी घड्याळे असा एकूण 89 हजरांचा ऐवज चोरून नेला. चावला रात्री साडेआठ वाजता वाकड ब्रिज येथे उतरले असता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.