BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : पादचारी तरुणाला चौघांनी लुटले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाला चार अनोळखी चोरट्यांनी लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 21) पहाटे मारुती शोरूम समोर वाकड येथे घडली.

विजय पोपट गुरव (वय 30, रा. रहाटणी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास वाकड येथील मारुती शोरूम समोरून रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी त्यांना अनोळखी चार इसमांनी अडवले त्यांच्या खिशातील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण दहा हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज हिसकावून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

.