BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – पतीला मारहाण करत त्याच्या पत्नीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना सांगवी येथे रविवारी (दि. 19) रात्री सातच्या सुमारास घडली.

स्वप्नील शिवाजी राऊत (रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील याने पीडित महिलेचा मागील काही दिवसांपासून पाठलाग केला. रविवारी महिलेशी अश्लील वर्तन करत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2