Hinjawadi : घरफोडी करून चोरट्याने चोरले घरातील सर्व साहित्य

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून घरातून टीव्ही, फ्रीज, सिलेंडर, टेबल, खुर्ची असे 16 हजार 400 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 28 जून रोजी दुपारी दत्तवाडी नेरे येथे उघडकीस आली.

घनश्याम भीमा दुनघव (वय 32, रा. एक्सरबिया टाऊनशिप रोड, दत्तवाडी, नेरे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम 15 जून रोजी कामानिमित्त बाहेरगावी गेले. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप तोडून घरातून टीव्ही, फ्रीज, सिलेंडर, टेबल, खुर्ची असे 16 हजार 400 रुपयांचे साहित्य चोरून नेले. 28 जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घनश्याम घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.