Hinjawadi : प्रवासी ग्राहकाला चाकूचा धाक दाखवून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – वाकडहून मुंबईला कारमधून जात असताना तिघांनी मिळून प्रवासी ग्राहकाला चाकूचा धाक दाखवला. त्याच्याकडून 1 लाख 25 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री साडेनऊच्या सुमारास वाकड ब्रिजखाली हिंजवडी येथे घडली.

मुकेश मोहिंदर कपूर (वय 46, रा. सनवे मेगापोलीस फेज तीन, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश रविवारी रात्री मुंबईला जाण्यासाठी निघाले. त्यांनी स्विफ्ट कार बुक केली. कारमधून जात असताना भूमकर चौकात आणखी दोघेजण कारमध्ये बसले. त्या दोघांनी मुकेश यांना चाकूचा धाक दाखवला. मुकेश यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल आणि अन्य वस्तू असा एकूण 1 लाख 25 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि मुकेश यांना अज्ञात ठिकाणी सोडून दिले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गवारी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.