Hinjawadi Crime : ‘शादी डॉट कॉम’वरुन लग्नाचे आमिष दाखवून विवाहित पुरुषाकडून अत्याचार

एमपीसी न्यूज – शादी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवर विवाहासाठी (Hinjawadi Crime) रिक्वेस्ट पाठवून महिलेशी जवळीक साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. स्वतःचे लग्न झाल्याचे तिच्यापासून लपविले. तसेच, तिच्याकडून वेळोवेळी 16 लाख 10 हजार रुपये घेतले. हा प्रकार 15 मार्च 2018 ते 14 मे 2022 या कालावधीत सुसगाव आणि तुळजापूर येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि. 1 जुलै) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गिरीश भीमराव भोसले (वय 39, रा. उस्मानाबाद. मूळ रा. सोलापूर) याच्या विरोधात (Hinjawadi Crime)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 आरोपी गिरीशने फिर्यादी महिलेला शादी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून विवाहासाठी रिक्वेस्ट पाठवली. आरोपीने तो स्वतः विवाहित आहे, हे फिर्यादीपासून लपवून ठेवले. फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केला. महिलेचा विश्वास संपादन करून वेळोवेळी 16 लाख 10 हजार रुपये घेतले. ते पैसे परत न देता महिलेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.