Hinjawadi crime News : पैसे घेतल्याचा विचारणा करणाऱ्या दांपत्यासोबत वाद; एकाला अटक

एमपीसी न्यूज – खिशातून पैसे गहाळ झाले असल्याने ते पैसे कंपनीत काम करणा-या सहका-याने घेतले का, अशी विचारणा करणा-या दांपत्यासोबत एकाने वाद घातला. ही घटना सोमवारी (दि. 24) सकाळी दहा वाजता हिंजवडी येथील एमटेक कंपनीसमोर बसमध्ये घडली. पोलिसांनी वाद घालणाऱ्याला अटक केली आहे.

महेश रामा हराळे (वय 25, रा. धायरीगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रेखा सिद्धार्थ जोंधळे (वय 30, रा. पांडवनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा यांचे पती सिद्धार्थ यांचे पैसे रविवारी कुठेतरी पडले. त्यामुळे सिद्धार्थ यांनी त्यांच्या कंपनीत काम करणा-या आरोपी महेश याला याबाबत विचारले. त्यावरून महेश याने सिद्धार्थ यांना हाताने मारहाण केली आणि ढकलून दिले.

त्यावेळी बसमधील लोखंडी रॉड सिद्धार्थ यांच्या डोक्याला लागला. फिर्यादी रेखा भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीसोबत झालेल्या झटापटीत त्यांचे मंगळसूत्र तुटून खाली पडले आणि गहाळ झाले.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महेश याला अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.