Hinjawadi : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाणा-या इसमाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 20) पहाटे पुणे-मुंबई सर्व्हिस रोडवर वाकड येथे घडली.

शिवाजी नारायण जाधव (वय 49, रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. संतोष नारायण जाधव (वय 39) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे शिवाजी दुचाकीवरून (एमएच 14 / डीडी 6543) पुणे-मुंबई सर्व्हिस रोडवरून जात होते. योगी हॉटेलजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये शिवाजी गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत त्यांचे बंधू संतोष यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.