Hinjawadi : फेज दोनमधील व्हेरॉक कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात ‘अग्निशमन’ला यश

एमपीसी न्यूज – हिंजवडी फेज दोनमधील व्हेरॉक लायटिंग सिस्टिम प्रा. लि. कंपनीला भीषण आग लागली. ही घटना आज, मंगळवारी (दि. 18) पहाटे घडली. या कंपनीमध्ये वाहनांना लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे तयार केले जातात. योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे तिथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु कंपनीमधील एका कर्मचाऱ्याला किरकोळ स्वरूपात भाजलेले आहे, त्यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज दोनमध्ये व्हेरॉक ही कंपनी आहे. कंपनीला पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. काही क्षणात आगीचा भडका उडाला आणि आगीने उग्र रूप धारण केले. काही वेळेत मोठ्या प्रमाणात आग लागली होती.

आज, मंगळवारी (दि. 18) पहाटे 3 च्या सुमारास व्हेरॉक लायटिंग कंपनी, हिंजवडीला भीषण आग लागली होती. कंपनीमध्ये फोर व्हीलर गाड्याचे हेड लाईट, टेल लाईट बनवीत होते. हे बनविण्यासाठी लागणारे रबर, बेस कोट थिनर, हार्ड कोट थिनर, हार्ड कोट पेंट , बेस कोट पेंट, सिलिकॉन, अश्या काच्या मालाचा वापर केला जात होता. जवळ पास ८ एकरमध्ये कंपनीचा विस्तार आहे.

पीएमआरडीए अग्निशमन दल एमआयडीसी अग्निशमन दल व पुणे, पिंपरी चिंचवड, व विविध कंपनीमधील अग्निशमन दल कार्यरत होते १२ अग्निशमन वाहने व २० पाण्याचे टँकर द्वारे जवळपास १० तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र अधिकारी एस टी इंगवले (एमआयडीसी), केंद्र अधिकारी सुजित पाटील (पीएमआरडीए) रामदास चोरगे (उप अग्निशमन अधिकारी) विजय महाजन (उप अग्निशमन अधिकारी) यांचे सहकार्य मोलाचे ठरले. यासोबत हितेश आहेर, राहुल शिरोळे,अक्षय शिंदे, वैभव कोरडे, उमेश फाळके, धनंजय भक्त , खेडेकर, कुलाल, गदाडे, ब्राम्हणकर, साठे, चावरे, भिवाटे, दत्ता, साळूखे, या सगळ्यामुळे हे शक्य झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.