Hinjawadi crime news : घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची वेळोवेळी मागणी करत तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याची फिर्याद विवाहितेने हिंजवडी पोलिसात दिली आहे. हा प्रकार सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व, ठाणे येथे घडला.

पती निकेश नरेश लखदीर (वय 30), प्रीती लखदीर (वय 50), नरेश लखदीर (वय 55, सर्व रा. डोंबिवली पूर्व, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 18 फेब्रुवारी 2018 ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीत घडला असून याबाबत 20 जानेवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी पीडित विवाहितेकडे वेळोवेळी घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच तिच्या नोकरीच्या पगारातून घरखर्च करावा असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिला शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.