Serum Institute victims News : सीरमतर्फे ‘त्या’ पाच मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत!

एमपीसी न्यूज : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस एस. पूनावाला यांनी सीरम बीसीजी इमारत आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

हडपसर मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या टर्मिनल 2 येथील आर-बीसीजी प्लान्टच्या इमारतीला दुपारी 1 च्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमनच्या 12 गाड्या आणि एनडीआरएफच्या जवानांच्या सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 4.30 च्या सुमारास आग आटोक्यात आली. बचावकार्यादरम्यान 3 जणांना सुखरुप वाचविण्यात आले.

त्यानंतर सायंकाळी तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्या मजल्यांचे कुलिंगचे काम सुरू असताना पाच कामगारांचे मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. ससून सर्वोपचार रुग्णालयात मृतदेह दाखल झाल्यानंतर त्यांची ओळख पटली. सर्व पाचजण कामगार होते. विद्युत फिटिंगचे काम करणारे कंत्राटी कामगार होते. मृतांपैकी 2 महाराष्ट्राचे तर 3 परप्रांतीय होते.

सीरमच्या दुर्दैवी आगीच्या दुर्घटनेत पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत खुद्द सायरस पूनावाला यांनी घोषित करत संवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.