Hinjawadi News : झिरो टॉलरन्स मोहिमेंतर्गत नियमभंग करणा-या 844 वाहन चालकांवर कारवाई

हिंजवडी वाहतूक विभागाची मोहीम

एमपीसी न्यूज – झिरो टॉलरन्स मोहिमेंतर्गत हिंजवडी वाहतूक विभागाने नियमभंग करणा-या वाहन चालकांवर कारवाई केली. साडेचार तास राबवलेल्या या मोहिमेमध्ये 844 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये पाच लाख 81 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन दंड न भरणा-या 714 वाहन चालकांकडून तीन लाख 62 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

बुधवारी (दि. 12) सकाळी सकाळी साडेआठ ते दुपारी एक वाजताच्या कालावधीत हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत नऊ पोलीस अधिकारी, 83 पोलीस अंमलदार, 21 ट्राफिक वार्डन व जलद प्रतिसाद पथक (आरसीपी) यांच्या नऊ टिम तयार केल्या. भुजबळ चौक, इंडियन ऑईल पेट्रोल पंप, शिवाजी चौक, विप्रो फेज-1, जॉमेट्रिक सर्कल, टाटा टी जंक्शन, विप्रो सर्कल-2, राधा चौक आणि बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी या टीमने कारवाई केली.

मोटार वाहन अधिनियमा अंतर्गत ट्रिपल शिट वाहन चालविणे, काळी टिंडेड काच वापरणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विना लायसन्स वाहन चालविणे, वाहन चालविताना लायसन्स सोबत न बाळगणे, सायलन्सर मध्ये बदल करणे, वाहनाला साईड आरसा नसणे, विना हेल्मेट वाहन चालविणे, वाहनाचा विमा नसताना वाहन चालविणे, पोलीस इशाऱ्याचे पालन न करणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे इत्यादी व इतर मोटार वाहन कायद्याच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमभंग करणा-या 844 वाहन चालकांवर कारवाई करून 5 लाख 81 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला. तसेच ज्या वाहन चालकांनी ऑनलाईन पद्धतीने आकारण्यात आलेला दंड भरला नाही अशा 714 वाहन चालकांकडून तीन लाख 62 हजार 700 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरदवाड, गजरमल, जमदाडे, उपनिरीक्षक यादव, पठाण, शेख, जाधव, राठोड, डबिर, पोलीस अंमलदार, ट्राफीक वार्डन तसेच जलद प्रतिसाद पथक (आरसीपी) यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.