Hinjawadi News : अवैधरित्या दारूविक्री करणा-यांवर हिंजवडी पोलीस व अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या चार कारवाया

एमपीसी न्यूज – अवैधरित्या दारू विक्री करणा-यांवर हिंजवडी पोलिसांनी तीन ठिकाणी तर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मामुर्डी येथे एक कारवाई केली. चारही कारवायांमध्ये 28 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिल्या कारवाईमध्ये पोलीस शिपाई अमित जगताप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राकेश शंकरलाल कंजर (वय 27, रा. हिंजवडी, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राकेश याने अवैधरित्या दारू विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी (दि. 21) दुपारी दीड वाजता राकेश याच्या घरी छापा मारून कारवाई केली. यामध्ये 35 लिटर हातभट्टी दारूचे चार कॅन्ड पोलिसांनी आढळून आले. एकूण 11 हजार 200 रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली.

दुस-या कारवाईमध्ये पोलीस हवालदार विशाल बो-हाडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बिट मार्शल ड्युटी करत असताना त्यांना माहिती मिळाली की, एक महिला दत्त मंदिर महाळुंगे येथे दारू विक्री करीत आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. 21) दुपारी अडीच वाजता दत्त मंदिराजवळ महाळुंगे येथे कारवाई केली. त्यात पोलिसांना 720 रुपयांची देशी दारूच्या बाटल्या आणि 220 रुपये रोख रक्कम मिळाली. रूपाली दशरथ पाडाळे (वय 30, रा. पिंपळाची तालीम दत्तमंदीर शेजारी, महाळुंगे गावठान, ता. मुळशी) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिस-या कारवाईमध्ये पोलीस शिपाई रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुड्डु पुरणलाल यादव (वय 30, रा. अमित गोलांडे यांच्या पत्र्याच्या खोलीत पुराणिक सोसायटी जवळ महाळुंगे, ता. मुळशी), शुभम भाट (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस शिपाई पवार हे हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अवैध धंदे विरोधी पथकात काम करतात. ते सोमवारी (दि. 21) रात्री सव्वासात वाजता हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना माहिती मिळाली की, वी टी पी लेबर कॅम्प जवळ महाळुंगे येथे एक व्यक्ती हातभट्टी दारू अवैधरित्या विकत आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी आरोपींकडून 70 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि रोख रक्कम असा एकूण पाच हजार 910 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

चौथ्या कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक प्रसाद कलाटे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बादल सायबु कचरावत (वय 26, रा. कंजारभाटवस्ती, मामुर्डी-सांगवडे रोड, मामुर्डी, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नाईक कलाटे यांना माहिती मिळाली की, मामुर्डी येथे एक व्यक्ती गावठी हातभट्टी दारू विकत आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यावेळी आरोपी बादल हा त्याच्या घरासमोर बसून लोकांना गावठी हातभट्टी दारू विकत होता. त्याच्याकडून पोलिसांनी 70 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि 30 लिटर दारूचे 150 फुगे असा एकूण 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.