Vehicle Theft : सांगवी, तळेगाव, चिखली मधून तीन लाखांची सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – सांगवी, तळेगाव दाभाडे आणि चिखली पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यामध्ये चोरट्यांनी चार दुचाकी, एक तीनचाकी आणि एक कार चोरून नेली आहे.

असिफ युसुफ शेख (वय 30, रा. जुना तोफखाना, सिव्हील कोर्टमागे, शिवाजीनगर, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा गॅरेज आणि जुन्या वाहनांची खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे रमेश खंडू पांढरकर (रा. संभाजीनगर, आकुर्डी) यांची तवेरा कार (एम एच 14 / ए एच 5897) विक्रीसाठी आली होती. ती कार चिखली येथील एका व्यक्तीला विकण्यासाठी शेख यांनी 15 फेब्रुवारी रोजी कुदळवाडी चिखली येथे आणली. मात्र त्या दिवशी त्यांचा व्यवहार झाला नाही. त्यामुळे शेख यांनी ती कार किंग काट्यासमोरील रस्त्यावर कुदळवाडी येथे पार्क केली. दुस-या दिवशी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास शेख यांनी कार पार्क केलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांची 50 हजार रुपये किमतीची कार चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरक्षनाथ निवृत्ती सोनवणे (वय 50, रा. तुकाराम नगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोनवणे यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांनी एक तीनचाकी वाहन (एम एच 14 / एच एम 7403) खरेदी केले आहे. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी त्यांचे तीनचाकी वाहन दुकानासमोर पार्क केले. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांचे एक लाख 80 हजार रुपये किमतीचे वाहन चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

सौरभ मनिष डाळवाले (वय 23, रा. वतननगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचा न्यूज पेपर एजन्सीचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / सी क्यू 4425) 18 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली. पहाटे पाच वाजता ते न्यूजपेपरचे वितरण करण्यासाठी निघाले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. तसेच त्यांच्याच इमारतीत राहणारे बाळू धोंडिबा चव्हाण यांची देखील 10 हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी जी 0597) चोरीला गेली आहे.

सागर रामचंद्र केंगले (वय 27, रा. संगमनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी केंगले हे पीएमआरडी कार्यालय येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. 20 फेब्रुवारी रोजी ते रात्री नऊ वाजता कामाला गेले. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे आठ वाजता घरी आले. त्यावेळी त्यांच्या घराचे लॅचलॉक उचकटले असल्याचे दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असता घरातून 28 हजारांचे दागिने चोरीला गेले होते. तसेच रोहित सुनील कांबळे (वय 29) यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 12 / जी वाय 8184) चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

ज्ञानोबा संग्राम सुर्यवंशी (वय 40, रा. विश्वशांती काँलनी, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद आली आहे. फिर्यादी यांचा चुलतभाऊ मुंबईहून पुण्याला आला होता. फिर्यादी आणि त्यांचा चुलत भाऊ दोघेजण मिळून दुस-या चुलत भावाला भेटण्यासाठी 19 फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजता गेले. चुलत भावाला भेटून पावणे आठ वाजता ते परत आले असता भावाच्या घरासमोर पार्क केलेली 10 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी अवघ्या 15 मिनिटात चोरून नेल्याचे उघडकीस आ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.