Sangvi Crime News : टाटा हॅंरीहर, रॉयल इन्फिल्ड बुलेट घेऊन देण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – टाटा हॅंरीहर, रॉयल इन्फिल्ड बुलेट गाडी माहेरहून आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला.

राधारमण राधामोहन सिंग राजकुमार, सासरे राधामोहनसिंग राजकुमार, सासु, नंनद, राधेशाम सिंग राजकुमार (सर्व रा. बिशनूपुर, मणिपुर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 35 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 21) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी राधारमण यांचा प्रेमविवाह झाला आहे. 7 डिसेंबर 2019 रोजी गुडगाव येथे आणि 12 डिसेंबर 2019 रोजी मणिपूर येथे दोघांचा आंतरजातीय विवाह दोन्ही दोघांच्या धार्मिक पद्धतीने झाला. लग्नात फिर्यादी यांच्या घरच्यांनी साडेदहा लाख रुपये खर्च केला तसेच सासरच्या लोकांचा मानपान केला.

लग्नानंतर एक महिन्याने आरोपींनी आपसांत संगनमत करून “तुझ्या घरच्यानी आमचा काही मानपान केला नाही, असे म्हणत वारंवार टोमणे मारले. माहेरच्या लोकांना नावे ठेवली. त्यांच्याकडून टाटा हॅंरीहर कार, रॉंयल इनफिल्ड बाईक घेऊन येण्याची मागणी केली. यावरून विवाहितेला वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करीत तिचा मानसिक व शारिरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने माहेरी आल्यानंतर याबाबत गुन्हा नोंदवला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.