Hinjawadi News : पानटपरी चालकाची 10 हजार रुपयांची सिगारेट असलेली बॅग हिसकावली

एमपीसी न्यूज – पानपटरी चालकाची 10 हजार रूपयांची सिगारेट असलेली बॅग हिसकावली. पानपटरी चालक दुचाकीवरून घरी जात असताना 8 ते 9 जणांनी त्यांना अडवून धारदार शस्त्राने वार करून जखमी केले व बॅग हिसकावली. कस्तुरी चौक, द्रोपदा लॉन्स स्पाईन रोड, हिंजवडी येथे गुरूवारी (दि.07) ही घटना घडली.

 
योंगेद्र प्रताप रामबहादुर सिंग (वय 39, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9 अनोळखी  व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योंगेद्र प्रताप हे पान टपरी बंद करून दुचाकीवरून घरी जात होते. कस्तुरी चौक, द्रोपदा लॉन्स स्पाईन रोड, हिंजवडी येथे आल्यावर आरोपींनी फिर्यादी यांची अडवणूक केली. त्यांच्या हातावर वार करून खांद्याला अडकवलेली 10 हजार रुपयांचे सिगारेट असलेली बॅग हिसकावली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.