Hinjawadi : पार्कींगमधली गाडी पडली म्हणून हॉटेल चालकाकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – पार्कींग मधून गाडी काढत असताना दुसरी (Hinjawadi) दुचाकी खाली पडली यावरून चालकाकडून एका 39 वर्षीय नागरिकाला बेदम मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.6) सायंकाळी हिंजवडी येथे घडली आहे.

याप्रकरणी सौरव श्रीदिपक कुमार शर्मा (वय 39 रा.मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सुनील रोकडे, विशाल पाटील व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : संजय राऊत यांची उद्या पुण्यात प्रथमच जाहीर सभा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पार्किंगमधून दुचाकी (Hinjawadi) बाहेर काढत असताना दुसरी दुचाकी पडली. यावरून आरोपींनी फिर्यादीला तू गाडी कशी का पाडली म्हणून शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली.

यावेळी आरोपींनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने माराहाण करत जखमी केले. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.