Pune : विविध मागण्यांसाठी महापालिका आयुक्तांशी दीपक मानकर यांची चर्चा

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध (Pune) मागण्यांसाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी भेट घेतली.

पुणे मेट्रो स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजीनगर नावाचे फलक लावणे, पुणे मनपा सेवानिवृत्व सेवकांना थकबाकी मिळणे, तसेच इंग्रजी शाळेत डीएड शिक्षकांची भरती करणे अशा प्रमुख मागण्यांवर विस्तृत चर्चा करत निवेदन दिले.

Hinjawadi : पार्कींगमधली गाडी पडली म्हणून हॉटेल चालकाकडून एकाला मारहाण

यावेळी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती दीपक मानकर यांनी दिली. यावेळी पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेविका प्रिया गदादे उपस्थित होत्या.

दरम्यान, दीपक मानकर अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी विविध (Pune) विकासकामांचा धडाकाच लावला आहे. पुणे शहरात नवनवीन कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत आणून नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडी महत्वपूर्ण असल्याचे मानकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.