Talegaon : गतीरोधकावरून गाडी स्लीप होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी रोडवरील वडगाव फाटा (Talegaon) येथे गतिरोधकावरून दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 20 ऑक्टोबर 2023 रोजी घडला होता. उपचारा दरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

याप्रकऱणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मयत जयराम केदार सिंह (वय 38 रा. मुळसी, मुळ उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : विविध मागण्यांसाठी महापालिका आयुक्तांशी दीपक मानकर यांची चर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा त्याच्या ताब्यातील (Talegaon) दुचाकी घेऊन भरधाव वेगाने जात होता. यावेळी वडगाव फाटा येथे त्याची दुचाकी गतिरोधकावरून घसरून पडली.

यात तो गंभीर जखमी झाला व दावाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. य़ावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.