Hinjawadi : सिगारेटचे पैसे मागितल्यावरून टपरीचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – टपरीवर सिगारेट घेतल्यानंतर टपरीचालकाने पैसे मागितले. यावरून तीन जणांनी मिळून टपरी चालकाला दगडाने मारहाण केली. यामध्ये टपरी चालक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेनऊच्या सुमारास बावधन येथे घडली.

मुन्नालाल ननके प्रजापती (वय 38, रा. बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिली माहितीनुसार, फिर्यादी मुन्नालाल यांची बावधन येथील जिजाई हॉटेल समोर पानटपरी आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एम एच 12 / सी ई 1563 या मोपेड दुचाकीवरून तीनजण आले. त्यांनी मुन्नालाल यांच्याकडून सिगारेट घेतली. मुन्नालाल यांनी आरोपींकडे सिगारेटचे पैसे मागितले. यावरून आरोपींनी मुन्नालाल यांना हाताने व दगडाने मारहाण केली. यामध्ये मुन्नालाल यांच्या डोक्याला, खांद्यास व हाताला गंभीर दुखापत झाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.