Hinjawadi : घरातून चोरीला गेलेल्या एटीएम कार्डद्वारे काढले पावणे दोन लाख

एमपीसी न्यूज – घरातून एटीएम कार्ड (Hinjawadi) चोरून नेले. एटीएमद्वारे हिंजवडी आणि नांदेड येथून 1 लाख 72 हजार रुपये काढून घेतले. ही घटना 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पंचरत्न चौक, हिंजवडी येथे घडली.

तेजस विठ्ठल मुंढे (वय 30, रा. हिंजवडी, मूळ रा. नांदेड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि.2) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: सनदी लेखापालांनी आर्थिक विनियोगाचा मार्ग दाखवावा – स्वामी गोविंददेव गिरी यांचे प्रतिपादन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजस हे हिंजवडी (Hinjawadi) येथे भाड्याने राहतात. त्यांच्या खोलीत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने पाकिटातून एटीएम कार्ड चोरून नेले. त्या एटीएमच्या आधारे हिंजवडी आणि नांदेड येथील एटीएम सेंटरमधून 1 लाख 72 हजार रुपये काढले. याबाबत तेजस यांना त्यांच्या शेजारी राहणारा श्रीकांत नरुडे याच्यावर संशय आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. एटीएम कार्ड चोरीला गेले किंवा हरवले असता त्वरीत बँकेशी संपर्कसाधून कार्ड ब्लॉक करावे असे आवहान पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.