Hinjewadi Crime : कत्तलीसाठी नेणाऱ्या तीन जनावरांची सुटका, एकाला अटक  

एमपीसी न्यूज : कत्तल करण्यासाठी जनावरांची टेम्पो मधून वाहतूक करणाऱ्या एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.(Hinjewadi Crime) ही कारवाई सुस खिंड येथे शनिवारी (दि. 3) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

सुग्रीव रोहिदास शिंदे (वय 39 रा.हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार शंकर उत्तेकर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Book Publishing : श्वेता कुलकर्णी यांची बारा पुस्तके प्रकाशित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुग्रीव शिंदे याने त्याच्या ताब्यातील एक लाख रुपये किमतीच्या वाहनातून तीन जनावरांची कत्तल करण्यासाठी वाहतूक केली याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी सुसखिंड येथे टेम्पो अडवला पोलिसांनी आरोपी सुग्रीव याच्याकडे चौकशी केली (Hinjewadi Crime) असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यामध्ये आरोपी तीन जनावरे कोंडवा येथे कत्तल करण्यासाठी नेत असल्याचे उघडकीस आले हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.