Pune Crime News : पतीनेच पत्नीला सहा मित्रांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास पाडले भाग

एमपीसी न्यूज: लैंगिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या पतीने पत्नीला सहा जणांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्या प्रकरणात पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर तिचा पती सह अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

2017 ते जुलै 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर या महिलेच्या पतीविरोधात तिला जबरदस्तीने हे कृत्य करायला भाग पाडल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बारामती शहरातील फलटण रस्त्यावर ही महिला राहते. पती लैंगिक दृष्ट्या दुर्बल असल्याने त्याने तिने इतरांशी संबंध ठेवावेत यासाठी दबाव टाकला. मित्रांच्या मोबाईलवर मेसेज करून तो त्यांना घरी बोलावत असे. आणि त्यांना हे कृत्य करण्यास भाग पाडत असे. पत्नीने याला विरोध केला तर तिला ठार मारण्याची धमकी देत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान पीडित महिलेने 9 डिसेंबर रोजी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.