iCubia 2022 : विकासाच्या प्रक्रियेत आरोग्य सेवा आणि डिजिटायझेशनची गरज : डॉ. सीराम रामकृष्ण

एमपीसी न्यूज : जग वेगाने बदलत आहे. विविध क्षेत्रांचा विकास होत आहे. विकासाच्या प्रक्रियेत आरोग्य सेवा, शाश्वत विकास आणि डिजिटायझेशन यावर भर देण्याची गरज आहे असे प्रतिपादन सिंगापूर येथील राष्ट्रीय विद्यापीठाचे डॉ. सीराम रामकृष्ण यांनी केले.

चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे सहाव्या ‘आयक्युबीया 2022’ (iCubia 2022) आणि पहिल्या ‘आयमेस 2022’ या आंतरराष्ट्रीय परिषदांचे उद्घाटन सिंगापूर येथील राष्ट्रीय विद्यापीठाचे डॉ. सीराम रामकृष्ण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयईईई पुणेचे अभिजित खुरपे, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे,पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, नरेंद्र लांडगे, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, ‘आयक्युबीया 2022’चे डॉ. महेश कोलते, ‘आयमेस 2022 चे डॉ. पद्माकर देशमुख, कॅपजेमिनी कंपनीचे उपाध्यक्ष अतूल कुरानी, हेनकेल इंडिया कंपनीचे व्यवस्थापक निलेश आडकर, आयईईई पुणेचे खजिनदार डॉ. अमर बुचडे आणि प्रतिनिधी धीरज चौरसिया उपस्थित होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, सध्या बहुविद्याशाखीय संशोधन होणे गरजेचे आहे. विविध क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, रोबोटिक्स यांचा वापर करून नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प करता येतील. हे संशोधन विद्यार्थी आणि संशोधकांना भविष्यात उपयुक्त ठरतील. यावेळी डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले की, परदेशातील कंपन्यांनी विद्यार्थी आणि संशोधकांसोबत काम करावे. यावेळी ‘आयक्युबीया 2022’चा डॉ. महेश कोलते यांनी, आणि ‘आयमेस 2022’चा डॉ. पद्माकर देशमुख यांनी आढावा घेतला. पीसीसीओईचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी संस्थेची माहिती दिली. तसेच संस्थेच्या नवीन विद्यापीठ प्रकल्पाचे सुतोवाच केले.जगात आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता असलेल्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, रोबोटिक्स यांचा वापर करून नावीन्यपूर्ण संशोधन यांना शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे तसेच , मॅकेनिकल आणि स्थापत्य अभियांत्रिकी मधील नवीन तंत्रज्ञानाचा उहापोह (iCubia 2022) करणे हा पहिल्या वहिल्या आयमेस 2022 या परिषदेचा उद्देश होता.

Chakan Development : चाकणच्या विकासाकडे स्थानिक नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे – राजेश अग्रवाल

डॉ. निळकंठ चोपडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. वर्षा हरपळे यांनी आभार मानले. परिषदेच्या समारोप सत्रात कॅपजेमिनी कंपनीचे उपाध्यक्ष अतुल कुरानी, हेनकेल इंडिया कंपनीचे व्यवस्थापक निलेश आडकर, आयईईई पुणेचे खजिनदार डॉ. अमर बुचडे आणि प्रतिनिधी धीरज चौरसिया उपस्थित होते.

यावेळी अतुल कुरानी सांगितले की, आयोटी तंत्रज्ञानाचा वापर करून वास्तविक समस्या सोडवून सर्वसामान्य लोकांचे जीवन सुखी करण्यावर संशोधनाचा भर असावा. भारत देश डिजीटल गुंतवणुकीसाठी पहिली पसंदी दिली जाते. निलेश आडकर म्हणाले, की कलात्मकता ही नाविन्यपूर्तीसाठी आवश्यक आहे आणि कार्बनमुक्त उत्पादनावर भर दिला पाहिजे.

प्रा. डॉ. नरेंद्र देवरे यांनी ‘आयमेस 2022’ चा आढावा घेतला. यामध्ये 133 संशोधन लेख सादर झाले. प्रा. डॉ रचना पाटील यांनी ‘आयक्युबा 2022’ चा आढावा दिला. यामध्ये 158 संशोधन लेख सादर झाले. यामध्ये 12 संशोधन लेख मलेशिया, फान्स, व्हिएतमान येथून होते, अशी माहिती दिली. यावेळी बोलताना चौरसिया यांनी स्टार्टअप उदयोगांना ही प्रोत्साहान दिले पाहीजे असे सांगित‌ले. कारण असे उद्योग तंत्रज्ञान विकासासाठी चालना देतात. या पुढील परिषदेचे संयोजक म्हणून डॉ. अजय गायकवाड आणि डॉ. किशोर किणगे यांची नेमणूक करण्यात आली. समारोप सत्राचे आभार डॉ. संदीप माळी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.