Shivajinagar Police : वाहन चोरीचा गुन्हा 24 तासात उघड

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) अवघ्या चोवीस तासात वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.2) ढेंगळे पूल येथे केली. अमीर अली वाहबअली शेख असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक 25 ते 26 वर्षाचा तरूण लाल–काळ्या रंगाची पल्सर बिना चावीची गाडी ढेंगळे पुल येथून मंगला टॉकीजकडे ढकलत नेत आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने सदर गाडी ही गुरुवारी (दि.1) खुडे ब्रिजच्या जवळून गाडी चोरली होती.

Chakan Development : चाकणच्या विकासाकडे स्थानिक नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे – राजेश अग्रवाल

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police) गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीकडून 15 हजार रुपयांची दुचाकी जप्त केली असून त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.