India News : रोहित शर्माला कर्णधार पदी एकही उत्तराधिकारी नाही- दिलीप वेंगसरकर

भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनवर टीका

एमपीसी न्यूज – विश्व टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (India News) अपयशानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वावर बरेच लोक प्रश्न उठवत आहेत. रोहित शर्मा सह पूर्ण संघाला सुधारण्याची गरज आहे असे बऱ्याच भारतीय क्रिकेट संघाच्या समर्थकांचे व क्रिकेट चाहत्यांचे मत आहे. सुधारणे म्हणजे नव्या खेळाडूंना संधी देणे तर जे कमकुवत कामगिरी करत आहेत त्यांना बाहेरचा रास्ता दाखवणे. परंतु एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जवळ आल्याने या गोष्टी अंमलबजावणीत आणण्यात हवा तेवढा वेळ नसून माजी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार, विश्वचषक  व  निवडकर्ते दिलीप वेंगसरकारांनी भारतीय संघाच्या व्यवस्थापनेवर टीका केली आहे.

ते म्हणाले, ” दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गेले सहा सात वर्षे मी जे निवडकर्ते बघितले आहेत, त्यांच्याकडे भविष्याला अनुसरून दृष्टी नाही आहे व क्रिकेट या खेळाबाबत सखोल ज्ञान किंवा समज नाही आहे. जेव्हा दौरे ओव्हरलॅप झाले व प्रमुख खेळाडू अनुपलब्ध होते तेव्हा त्यांनी शिखर धवनला कर्णधार बनवले. खरेतर अश्याच प्रसंगी भावी कर्णधाराला नेमून तयार करायला हवे.”

यावर व्यवस्थापनाची निंदा करत तो पुढे म्हणाला, “तुम्ही कोणालाच तयार केलेले नाही. जो जसा येतो तसे तुम्ही त्याला खेळवत. तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाबद्दल बोलता, तर भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ (सक्षम राखीव खेळाडू) कुठे आहे? केवळ आयपीएलच्या मीडिया राईटद्वारे पैसे कमावणे हेच यश नव्हे.”

आत्ताच्या परिस्तिथीत रोहित शर्माला कर्णधार पदी एकही उत्तराधिकारी नाही आहे. धोनीच्या वेळी विराट कोहली कर्णधारपदासाठी सक्षम होता तर विराटच्या वेळी रोहित शर्मा सक्षम होता. परंतु आता रोहितच्या वेळी कोणीही त्याचा उत्तराधिकारी होण्यासाठी कोणीही सक्षम आहे असे दिसून येत नाहीये. हार्दिक पंड्या, शिखर धवन आणि रवी अश्विन असले विकल्प उपलबध असले तरी लॉन्ग टर्मसाठी नाहीत व एक युवा नेतृत्वाची भारताला गरज (India News)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.