Pune : व्हेरॉक अ-16 स्पर्धा संपन्न; व्हेरॉक वेंगसरकर अकादमीचा दमदार विजय

एमपीसी न्यूज – व्हेरॉक 16 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेचा अंतिम सामना आज, दिनांक 4 मे  गुरुवारी रोजी झाला. व्हेरॉक वेंगसरकर अकादमीने हा सामना 8 बळी आणि 24 षटके राखून एक तर्फी मारला. पूना यंग क्रिकेटर्स यांनी फलंदाजीसाठी पुरक असलेल्या मैदानाचा जास्त फायदा न घेता प्रसंगाला सामोरे जाऊ शकले नाहीत. सामन्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.(Pune) पालकांच्या समोर मुलांना पारितोषिके वाटण्यात आली. त्यानंतर या सोहळ्यात मुलांना माजी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार व व्हेरॉकचे मुख्य प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले.

पारितोषिक वितरण समारंभाला माजी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार दिलीप वेंगसरकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे, महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता संजय खाबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांचा  हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. (Pune) यावेळी दिलीप वेंगसरकर म्हणाले, ” युवा खेळाडूंमध्ये असलेली प्रतिभा आणि कौशल्य त्यांना देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुरेसे नाही, त्याकरिता जास्त मेहनत, कडक शिस्त आणि प्रामाणिक प्रयत्न अत्यावश्यक आहेत.”

Trailer launch : “चौक” चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

संजय खाबडे म्हणाले, ” महापालिकेच्या वतीने अकॅडमीला सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल.” यावेळी अकादमीचे प्रशिक्षक शादाब शेख, भूषण सूर्यवंशी, चंदन गंगावणे, चिंतामणी वैद्य, प्रमोद लिमण, राहुल वेंगसरकर आणि डॉ. विजय पाटीलही उपस्थित होते. पाहुण्यांचा हस्ते विजयी संघाला, उपविजेत्याना, सामनावीराला, स्पर्धांच सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज,  आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी पारितोषिके देण्यात आली.

अंतिम सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळी केल्याने व्हेरॉकचा वरद छत्तर हा सामनावीर व स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. व्हेरॉकच्याच अद्विक तिवारी याला सर्वोत्कृष्ट फलंदाज व सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक मिळाले. व्हेरॉकच्या अर्नेश पाटील याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पारितोषिक मिळाले. (Pune) पूना यंग क्रिकेटर्स यांनी उपविजेतेपद मिळवले. यजमान संघ व्हेरॉक वेंगसरकर अकादमी हे स्पर्धेचे विजेते ठरले व त्यांनी सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.