Maharashtra News :”महाराष्ट्रात हातात धनुष्यबाण धरल्यामुळेच काँग्रेसला बिहारमध्ये ठासून फटका”

एमपीसी न्यूज : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवताना सत्ता कायम राखली आहे. आज पहाटेपर्यंत सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेनंतर बिहारमधील सर्वच्या सर्व म्हणजे 243 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये एनडीएने 125 जागा मिळवत वर्चस्व राखले आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 74, जेडीयुला 43 तर इतर मित्रपक्षांना 8 जागांवर विजय मिळवता आला.

भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्येही आनंदाचे वातावरण आहे. बिहार निवडणुकीचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं भाजपच्या नेत्याकडून कौतुक सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी लौकिकाला साजेशी ठरली नाही. याच मुद्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटमध्ये अशिष शेलार म्हणतात, काँग्रेसने  महाराष्ट्रात “हातात” “धनुष्यबाण” धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता. महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन!

भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेलेल्या “जगंलराज का युवराज” ला बिहारच्या जनतेने नाकरले.. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत “जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज” युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.