Pimpri : शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार कामगार परिषद

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड, मावळ, मुळशी, चाकण, हिंजवडी परिसरातील संघटीत, असंघटित कष्टकरी व औद्योगिक कामगारांची कामगार परिषद कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. ही कामगार परिषद शनिवारी ३ नोव्हेंबरला होणार आहे.

रहाटणी येथील थोपटे लॉन्सवर ही कामगार परिषद दुपारी तीन ते सात या वेळेत होणार आहे. या परिषदेचे उदघाटन किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक यावेळी प्रमुख मार्गदर्शक माजी कृषी मंत्री शरद पवार, अध्यक्षस्थानी गिरीष बापट तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.