Talegaon Dabhade News : इंद्रायणी डी फार्मसी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात

एमपीसी न्यूज – भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त (12 ऑगस्ट) राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (डी फार्मसी) महाविद्यालयात ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

तळेगांव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (डी. फार्मसी ) महाविद्यालयामध्ये “राष्ट्रीय ग्रंथपाल दिन” उत्साहात संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य. श्री.जी. एस. शिंदे यांनी दिली.

09 ऑगस्ट 2021 भारतीय ग्रंथालय शास्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 129 वी जयंती,यांच्या स्मरणार्थ 12 ऑगस्ट हा राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ. मदन झाडे( ग्रंथालय विभाग प्रमुख इंद्रायणी महाविद्यालय), कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, उपाध्यक्ष दीपक शहा,कार्यवाह चंद्रकांत शेटे,कोषाध्यक्ष  शैलेश शहा, संस्थेच्या विश्वस्त निरुपा कानिटकर व संदीप काकडे विश्वस्त आदीमान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. एस. शिंदे  यांनी केले त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे महत्व व भारतीय ग्रंथालय शास्रात डॉ.एस.आर.रंगनाथन यांचे योगदान थोडक्यात सांगितले. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन ग्रंथपाल पंकज दुगाने यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.