Talegaon Dabhade News : कडोलकर कॉलनी मध्ये रोझीलँड्स या डे – केअरचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील कडोलकर कॉलनी मध्ये रोझीलँड्स या प्रोफेशनल डे – केअरचे उद्घाटन रविवारी (दि 27) झाले. तळेगावातील नोकरदार महिलांचा विचार करून सोनाली कोरे आणि विकास कोरे यांनी हे डे केअर सुरु केले आहे. न्युट्रीशियस फूड, विविध बौद्धिक खेळ, मुलांचा मानसिक व शारीरिक विकास करणारे वातावरण हे या डे केअरचे वैशिष्ट्य आहे.

मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू आणि उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते या डे- केअरचे उदघाटन झाले. याप्रसंगी साक्षी डायगनोस्टिकचे सिद्धार्थ किल्लावाला हे उपस्थित होते. तळेगावकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

सुधाकर शेळके यांनी याप्रसंगी योग्य ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलेगाव आंबी येथील केयरिंग हैंड्स या सामाजिक संस्थेच्या विश्वस्त शीतल जोशी यांनी केले. रोझीलँड्स या संस्थेबद्दल माहिती आणि उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन संस्थेच्या डायरेक्टर सोनाली कोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.