Kalewadi News : ब्राह्मण महासंघाच्या ‘ब्रह्मचैतन्य दिनदर्शिकेचे’ प्रकाशन

एमपीसी न्यूज – ब्रह्मचैतन्य परिमंडळ पिंपरी-चिंचवड आणि ब्रह्मचैतन्य क्रेडिट सोसायटी काळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी महिन्यांप्रमाणे सुरु होणा-या नवीन वर्ष (गुढीपाडवा) निमित्त तयार केलेल्या ‘ब्रह्मचैतन्य दिनदर्शिकेचे’ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यदुराजशास्त्री पारेकर, माजी नगरसेवक बाबा त्रिभूवन, कैलास थोपटे, पुष्कराज गोवर्धन, राजन बुडूख, श्रीपाद काडगांवकर, मंडळाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. पुणेरी पगडी, शाळ, श्रीफळ देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. बालाजी वाघमारे, बाळासाहेब पवार, अर्जुन मुळे, महेश बारसावडे, सचिन कुलकर्णी, अनंत कुलकर्णी, सुहास पोफळे, अॅड. अंतरा देशपांडे, मकरंद कुलकर्णी, आनंद देशमुख, सुषमा वैद्य, आनंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. गोविंदराव कुलकर्णी, पुष्कराज गोवर्धन, मधुकर रामदासी, शंकरराव कुलकर्णी, शंकरराव कातोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सीए परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उर्तीर्ण झाल्याबद्दल आणि कराटे खेळात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबाबत कृष्णेया सताळकर, ब्रह्मचैतन्य क्रेडिट सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सभासदांना भेट वस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन अनुपमा कुलकर्णी यांनी केले तर श्यामकांत कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप जोशी, अनुराधा कुलकर्णी, शरयू जोशी, श्रद्धा काडगांवकर, ज्योती सताळकर, सतिष कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.