India Corona Update : देशातील कोरोनाबाधितांची संख्या 54 लाखांवर, गेल्या 24 तासांत 92,605 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वेगाने पसरत आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज 90 हजारांहून अधिक रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 92 हजार 605 नवे रुग्ण आढळले असून देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 54 लाखांवर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 54 लाख 620 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 10 लाख 10 हजार 824 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांपैकी तब्बल 43 लाख 03 हजार 044 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 1,133 रुग्ण दगावले आहेत आतापर्यंत 86 हजार 752 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 94 हजार 612 जण कोरोनामुक्त झाले आहेत देशाचा रिकव्हरी रेट 79.67 टक्के एवढा झाला आहे तर मृत्यूदर 1.60 टक्के एवढा आहे. जगातील बरे झालेल्या सर्वाधिक रुग्णांची संख्या भारतात आहे.

देशात गेल्या 24 तासांत आजवरच्या सर्वाधिक 12 लाख 06 हजार 806 नमुने तपासण्यात आले आहेत. आजवर देशात तब्बल 6 कोटी 36 लाख 61 हजार 060 नमुने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. 1 ते 20 सप्टेंबर दरम्यान देशात तब्बल 17.79 लाख रुग्णांची वाढ झाली आहे तर, 22 हजार 283 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व उत्तर प्रदेश या राज्यांत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.