India Corona Update : गेल्या 24 तासात ‘रेकॉर्ड ब्रेक’ 22,771 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 442  जणांचा मृत्यू 

'Record break' in last 24 hours, 22,771 new coronaviruses recorded, 442 killed देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 60.72 टक्के झाले आहे.

एमपीसी न्यूज – देशात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच असून  गेल्या 24 तासात ‘रेकॉर्ड ब्रेक’ 22,771 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकूण रुग्नांची संख्या तब्बल साडे सहा लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 6,48,315 इतकी झाली आहे. देशात सध्या 2,35,433 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 3,94,227 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांत 442 जणांचा मृत्यू झाला. यासह मृतांचा एकूण आकडा 18 हजार 655 झाला आहे.

देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 60.72 टक्के झाले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात करोना रुग्णांची संख्या अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा 1.5 लाखांनी जास्त आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये 2,42,576 नमुना चाचण्या झाल्या असून एकूण 95,40,749 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 6,364 नवीन रुग्णांची नोंद झाली. हा एक दिवसातला सर्वाधिक आकडा आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1,92, 990 झाला आहे. तर, 24 तासांत 198 लोकांचा मृत्यू झाला. यासह मृतांचा आकडा 8,376 झाला आहे. दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या 90 हजारांहून अधिक झाली असून ती 92,175 वर पोहोचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.