Pimpri News : इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओतर्फे “जागतिक महिला दिनानिमित्त दर्जेदार सादरीकरणांचं आयोजन

एमपीसी न्यूज : इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM हा पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित रेडिओ संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक उत्तम सांस्कृतिक आणि शैक्षणिक व्यासपीठ म्हणून काम करत आहे‌. 29 ऑगस्ट 2022 रोजी सुरु झालेला हा रेडिओ अतिशय (Pimpri News) कमी कालावधीत लोकप्रिय होत आहे. आरोग्यमित्र फाउंडेशन आणि इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओने “जागतिक महिला दिनानिमित्त” 11 मार्च रोजी दोन दर्जेदार मनोरंजक आणि उद्बोधक सादरीकरणांचं आयोजन केलं आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीरांगनांची यशोगाथा सांगणारं, सुप्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ मिनल कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित नृत्यनाट्य ‘अपराजिता’ आणि पंढरपूरच्या वारीचा विलक्षण अनुभव यावा असं, वैभवी तेंडुलकर लिखित, दिग्दर्शित ‘वसा वारीचा’ हे नाट्यवाचन ही दोन्ही उत्तम सादरीकरणं या निमित्ताने पिंपरी-चिंचवडच्या रसिकांपर्यंत इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM च्या माध्यमातून पोहचणार आहे.

Dehu gaon : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूगावातील वाहतुकीत बदल

निगडी प्राधिकरण सेक्टर 26, येथील सेमिनार हॉल, पाचवा मजला, मेकॅनिकल बिल्डिंग,PCCOE, येथे शनिवार 11 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासोबतच इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओला भेट देण्याची संधीसुद्धा रसिकांना मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड वासियांनी या दोन्ही कलाकृतींचा अवश्य लाभ घ्यावा (Pimpri News) असं आवाहन इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ व आरोग्यमित्र फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.